कलंबिस्त ग्रामस्थांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
कलंबिस्त । प्रतिनिधी : सावंतवाडी कलंबिस्त ते शिरशिंगे मुख्य रस्ता हा कलंबिस्त मळा ते गणेशेळवाडी पर्यंत पूर्णपणे नादुरूस्त झाला आहे. रस्ता खड्डेमय झाल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय जिकरीचे व धोकादायक बनले आहे.
त्यामुळे या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून मिळावे अशी मागणी कलंबिस्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
भाजपचे आंबोली मंडळ अध्यक्ष रवी मडगावकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी सरपंच बाळु सावंत, आंन्तोन रॉड्रीक्स, संदेश बिडये, दशरथ पास्ते आदी उपस्थित होते. सदर रस्त्याचे काम त्वरीत न झाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर कलंबिस्त ग्रामस्थ कृष्णा सावंत, सोमा सावंत, चंद्रकांत सावंत, अनिल हरिश्चंद्र सावंत, अनिल रामा सावंत, कृष्णा भिकाजी सावंत, प्रकाश सावंत, रमेश सावंत, प्रकाश गुणाजी सावंत, विश्वजीत सावंत आदी उपस्थित होते.











