कोंडआंबेडमधील विवाहितेची आत्महत्या

संगमेश्वर : तालुक्यातील कोंडआंबेड भंडारवाडी येथे विवाहित महिलेने राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी घडली. त्याची नोंद रात्री उशिराने संगमेश्वर पोलिस स्थानकात करण्यात आली. आर्या ऑमकार पाष्टे असे या विवाहितेचे नाव आहे. संगमेश्वर पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, आर्या ऑमकार पाष्टे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आर्या पाष्टे हिने कोंडआंबेड येथे वडिलांच्या घरी खोलीतील लोखंडी बीमला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

काही वेळाने हा प्रकार घरातील मंडळींच्या लक्षात आला. त्यानंतर आर्याला तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून आर्याला मृत घोषित केले.