रत्नागिरी : अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वागीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी pmvishwakarma.gov.in ही वेबसाईट असून, या पोर्टल वरुन लाभार्थी अर्ज करु शकतात. तरी या योजनेचा जास्त जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.
लाभार्थी नोंदणी करण्यासाठी जवळील सीएसी सेंटरमध्ये जाऊन अर्ज करु शकतो.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :- आधारकार्ड, आधारलिंक मोबाईक क्रं, स्वतःचे कुटुबातील सर्वाचे आधार कार्ड, बॅक पासबुक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहे.
समाविष्ठ उद्योग :- सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, मुर्तीकार, परीट,शिपी, नाभिक, कुंभार, हार-तुरे तयार करणारे, विणकर, चटई झाडु, होड्या बांधणारे, दो-या तयार करणारे, कुलुप तयार करणारे, पारंपारीक खेळणी बनविणारे, मासेमारी जाळी बनविणारे या उद्योगातील कारागीरसाठी उद्योग चालु असलेल्या व पारंपारीक काम करणारे कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे लाभार्थी या योजने निवडले जातील त्यांना ओळखपत्र दिले जाते.
प्रशिक्षण :- या योजनेत लाभार्थी निवड झाल्यानंतर पात्र लाभार्थीना 5 दिवसाचे मुलभुत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विद्यावेतन रुपये 500/- प्रति दिवस प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ( 5 ते 7 दिवस किमान 40 तास प्रशिक्षण ) तसेच ज्या योजनेनुसार निवड झालेल्या कारागीरांना विशेष प्रशिक्षण हवे असल्यास त्याची देखील सोय या योजनेत करण्यांत आली आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा या योजनेत आहे.
यंत्रसामुग्री अनुदान :- 15 हजार रुपये वस्तु स्वरुपात (टुल किट) लाभार्थीची निवड झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होताच त्यांना त्यांच्या उद्योगासाठी लागणारे हत्यारे / अवजारे खरेदी करण्यासाठी रुपये 15 हजाराचे टुल किट वस्तु अनुदान स्वरुपात दिली जाते.
प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्यासाठी पहिल्या टप्यात तारणमुक्त व्यवसायीक्ता विकास कर्ज एक लाख रुपयांचे कर्ज ( 18 महिन्याच्या मुदतीत परत फेडीसाठी ) देण्यात येते. पहिल्या टप्याची रक्कम लाभार्थीनी वेळेत परतफेड केल्यास त्यास व्यवसायाच्या विस्तारासाठी दोन लाखापर्यंत कर्ज दुसऱ्या टप्प्यात ( 30 महिन्याच्या मुदतीत परत फेडीसाठी ) उपलब्ध होणार आहे. सदर अर्थसहाय्य केवळ 5 टक्के व्याजदराने मिळणार आहे. उर्वरीत व्याजाची रक्कम शासन जबाबदारी घेणार आहे.
पात्रतेचे निकष :- असंघटीत क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात – अवजारांनी काम करणारा व योजनेत नमुद केलेल्या 18 कुटुंब आधारीत पारंपारीक व्यवसायापैकी एका व्यवसायात असलेला कारागीर असणे आवश्यक आहे. वय वर्ष -18 पुर्ण असणे आवश्यक, लाभार्थीने मागील 5 वर्षात राज्य सरकारच्या तत्सम पत आधारीत योजना ( उदा. पीएमईजीपी, सीएमईजीपी, मुद्रा योजना,पी, एम स्वनिधी अशा योजना लाभ घेतलेला नसावा. जर त्यांनी शासनाच्या केंद्र वा राज्य शासनाच्या योजनेत लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेत पात्र होत नाही. कुटुबांतील एका सदस्यापुर्ता लाभ मर्यादीत आहे. आई वडील व त्यांची अविवाहित मुले यातील एकास या योजनेत लाभ घेता येतो. सरकारी सेवेत असलेली व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय या योजनेत पात्र नाहीत. ज्या कुटुंबात शासकीय नोकरीस असल्याचा त्याचा लाभ या योजनेत घेता येत नाही.












