घुमडाई देवी मंदिरात २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : रामलल्लाच्या पवित्र मुर्तिचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होत आहे. या निमित्त घुमडे येथील घुमडाई देवी मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ९ वा. पासुन विविध धार्मिक कार्यक्रम, १० वाजल्यापासुन अयोध्येतील प्राणःप्रतिष्ठा सोहळ्याची लाईव्ह क्षणचित्रे दाखविली जाणार आहेत. त्या नंतर महाआरती व भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, संध्याकाळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व रामभक्तानी आपल्या घरचा कार्यक्रम समजुन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.