सावंतवाडीच्या सुपुत्राचा मुंबई कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मान
सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई येथे अलिकडेच ‘आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल सोहळा ‘ संपन्न झाला. यावेळी सावंतवाडीचा सुपुत्र रोहित दत्तात्रय सावंत याने तयार केलेल्या ‘किंग ऑफ द वर्ल्ड ‘ या कॉमिक बुकचे प्रकाशन करण्यात आले.
सदर कॉमिक बुक तयार करण्यासाठी लेखक अब्राहिम वर्गीस, गिरीक तुलाराम, अरविंद सिन्हा व दृष्टि सेठ यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकाशन सोहळ्याला कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील नूतन लेडीज ब्युटी पार्लरच्या पार्लर
व्यवसायिक नूतन सावंत यांचा मुलगा रोहित दत्तात्रय सावंत याने रहेजा आर्ट कॉलेज वांद्रे मुंबई येथून फाईन आर्ट मध्ये पदवी
संपादन केली असून सध्या तो एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये तो नोकरी करतो. रोहितच्या या यशाबाबत रोहित सावंत याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.











