नांदगाव-जाखलवाडीत २६ रोजी विविध कार्यक्रम

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील नांदगाव-जाखलवाडी येथील युवा- युवतीमंच, ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहण, ९.३० वाजता हळदीकुंकू, १०.३० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी २ वाजता मडके फोडणे व संगत खुर्ची, ३.३० वाजता बक्षीस वितरण होणार आहे.