नमो चषक अंतर्गत इन्सुली विभागीय क्रिकेट स्पर्धेचे प्रमोद कामत यांच्या हस्ते उद्घाटन

बांदा । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत इन्सुली विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा बँक सदस्य तथा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. इन्सुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विविध संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

या उद्घाटन प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक,इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत, कास सरपंच प्रवीण पंडित, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मानसी धुरी, बांदा मंडळ उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, माजी सरपंच नंदू पालव, वाफोली उपसरपंच विनेश गवस, निगुडेचे माजी सरपंच दिनेश राणे, बांदा ग्राम पंचायत सदस्य बाळू सावंत, इन्सुली ग्रा.प. सदस्य स्वागत नाटेकर, सोसायटी चेअरमन आनंद राणे, माजी चेअरमन हरिश्चंद्र तारी, राजाराम राणे, अजय कोठावळे, महेश धुरी, राजन परब, शिवराम राणे, साबाजी परब, सदानद कोलगांवकर, समिधा शिंदे, सचिन दळवी, अजय सावंत, नितीन राऊळ आदी उपस्थित होते.