सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित यांच्या समवेत त्यांनी उद्घाटनाचा डाव खेळला. यावेळी कौस्तुभ पेडणेकर, किरण सावंत, श्रीकृष्ण आडेलकर, प्रवीण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.











