माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वराच्या महाशिवरात्री उत्सव सांगते निमित्त ‘जय शंकरा गंगाधरा’ ही गायन मैफिल होणार आहे.अभंग,भक्ती गिते,व नाट्यगीतांची ही मैफिल दापोली येथील ख्यातकीर्त गायक हेमंत देशमुख व रत्नागिरी च्या सुप्रसिद्ध गायिका सौ करुणा पटवर्धन रंगावणार आहेत.त्यांना तबल्याची साथ केदार लिंगायत,तर संवादिनी च्या साथीला चैतन्य पटवर्धन असणार आहेत.
ही गायन मैफिल सोमवारी,२० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होणार आहे.या गायन मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी यावे असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.