रत्नागिरी | प्रतिनिधी : स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांची वाडी, पोमेंडी बुद्रुक यानी आयोजित केलेल्या महालक्ष्मी चषक नाईट क्रिकेट स्पर्धेत जय भैरी खेडशी संघाने टेंभ्ये येथील जय भैरी संघाचा पराभव करून पहिला महालक्ष्मी चषक जिंकला.पोमेंडी बुद्रुक येथील मोरेश्वर जोशी यांच्या मळ्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत 22 संघ सहभागी झाले होते.विजेत्या संघाला चषक व रुपये 7777 उपविजेत्या संघाला चषक आणि रुपये 5555 देऊन तसेच उत्कृष्ट फलंदाज श्रवण पांचाळ, उत्कृष्ट गोलंदाज वैभव साळवी आणि मालिकावीर निशांत कसबेकर याना न्यासाचे मुख्य विश्वस्त उदय बोडस, उपमुख्य विश्वस्त प्रभाकर बाणे, विश्वस्त रामचंद्र शिंदे, विश्वस्त दिगंबर मयेकर, विश्वस्त परशुराम शिंदे, सहप्रायोजक अजित शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष शिंदे व परेश शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असले तरी उत्कृष्ट आयोजन करण्यात प्रमोद मयेकर, ओंकार शिंदे, अक्षय शिंदे, साईराज शिंदे, अनिकेत शिंदे, अनिकेत शिंदे, श्रेयस शिंदे व आदित्य शिंदे यानी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेला ग्रामस्थ व महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.