आज संध्याकाळी रत्नागिरीत खातू नाट्यमंदिरमध्ये त्रिवार जयजयकार रामा

आज रविवार, दि. 21 जानेवारी , संध्याकाळी 6 वाजता , खातू नाट्यमंदिर येथे रत्नागिरीतील कलाकार त्रिवार जयजयकार रामा हा रामगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

अयोध्येतील श्री राम मंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या आणि 35 पेक्षा जास्त कलाकार एका मंचावर असणारा हा कार्यक्रम नक्कीच अविस्मरणीय असणार आहे.

या कार्यक्रमाला रसिकांनी शक्य असल्यास पारंपरिक वेशात येण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

त्रिवार जयजयकार रामा
आज दि. 21 जानेवारी 2024
संध्याकाळी 6 वाजता
खातू नाट्यमंदिर, रत्नागिरी येथे.