उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेचा उपक्रम : मालवण कुडाळ तालुक्यातील 36 जणांचा सन्मान
अमित खोत | मालवण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अनुगामी लोकराज्य महाभियान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अयोध्या नगरी येथून आणलेल्या प्रभू श्री राम मूर्ती चा प्रदान सोहळा मालवण कुडाळ तालुक्यात रविवारी संपन्न झाला. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या व ‘अनुलोम’ सहकार्य करणाऱ्या भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा प्रमोद करलकर यांनाही प्रभू श्री रामांची मूर्ती प्रदान करत सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.
कुडाळ मालवण तालुक्यातील अनुगामी लोकराज्य महाअभियान या सामाजिक संस्थेचे 32 वस्ती मित्र तसेच ‘अनुलोम’ सहकार्य करणाऱ्या 4 विशेष व्यक्ती यात पूजा करलकर यांसह विजय केनवडेकर, बंड्या सावंत, प्रदीप माने यांनाही प्रभू श्री राम मूर्ती प्रदान करण्यात आली. अशी माहिती अनुगामी लोकराज्य महाअभियानचे कुडाळ भाग जनसेवक बाजीराव शंकर काळे यांनी दिली.
पूजा करलकर यांच्या निवासस्थानी मूर्ती प्रदान सोहळ्यात भाजप महिला शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, विशाखा पाटकर, संगीता पाटकर, प्रतिभा पाटकर, श्रेया करलकर व बाजीराव काळे उपस्थित होते.











