जि प शाळा लांजा खावडकरवाडी तसेच उर्दू शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
ओमान देशातही साजरा करण्यात आला संस्थेचा वर्धापन दिन
लांजा (प्रतिनिधी) हम सबके सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन गेली चार वर्षे लांजा तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या वतीने शहरातील विविध प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. शहरातील जि. प. शाळा खावडकरवाडी या ठिकाणी घेण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या शिक्षिका श्रीमती पाटील तसेच सुषमा पाटोळे या उपस्थित होत्या. तसेच उर्दू शाळेत करण्यात आल्या साहित्य वाटप प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अपसरा हुनेर, पदवीधर शिक्षक श्री खोडील तसेच मदसर मुल्ला, शफिक पटेल, मंजूर पटेल ,श्रीम कुदसिया पटेल, मोहसीन शेख हे शिक्षक उपस्थित होते. तर संस्थेचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष अखिल नाईक, सचिव राजू नाईक, महिला अध्यक्षा दिलशाद नाईक, तसेच श्री मापारी सर, योगेश खावडकर आदी उपस्थित होते.
याबरोबरच ओमान देशांमध्ये मुस्लिम वेल्फेअर सोसायटीची शाखा असून या शाखेच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी ओमान शाखाध्यक्ष अध्यक्ष मुबारक रखांगी, उपाध्यक्ष सलीम धामस्कर, सेक्रेटरी आदिल वागदरे, उप सेक्रेटरी अल्ताफ साठविलकर तसेच खजिनदार आसिफ साठविलकर ,शिराज झापडेकर, इमरान मुजावर, मुस्ताक राऊत, नजीर शेख, कासम सुर्वे, रज्जाक जेठी ,हनीफ बोदले, शबाब वाडेकर, इस्माईल राऊत, रईस रहाटविलकर, रियाज कलोट, इब्राहिम लांजेकर, इम्तियाज प्रसाद, इरफान फराद, इम्तियाज बोबडे, शोएब पाटणकर, फरीन लांजेकर, शौकत राऊत, रमजान बोबडे, निकत डिंगणकर, जुबेर मुल्ला, हनीफ बोबडे, अखिल वणू आदी उपस्थित होते.