फोंडाघाट मध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात “जय श्रीरामssss” चा गुंजारव —

 

आठवडा बाजार असूनही “रघुपती राघव राजाराम–” च्या भजनात बाजारपेठ दंग !

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना अन जन्मोत्सवानिमित्त पेठेमध्ये फटाक्याची आतषबाजी ! स्टॅन्डवरील रांगोळीचे आकर्षण !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — गावचे बारा प्रभाग आणि बाजारपेठ, तसेच पंचक्रोशीतील विविध मंदिरामध्ये, अयोध्येतील सोहळ्याच्या शंखनादानंतर, “श्रीरामs जय रामss जय- जय रामsss “जयघोषात हा सोहळा, ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत आणि भक्तीभावाने फोंडाघाट मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी गावच्या वेशी वरील सह्याद्रीच्या कडेकपारी मधून “सियावर रामचंद्र की जय” च्या बुलंद घोषणांनी एकच गुंजारव केला. त्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्त्यांच्या निगराणीखाली,प्रत्येक मंदिरातील उपक्रम आस्थेने आणि श्रद्धापूर्वक संपन्न झाला. त्याला गावातील सर्वपक्षीय आबाल वृध्द,-ग्रामस्थ,महिला- पुरुष- युवाई ने उपस्थित राहून एकात्मतेचे दर्शन घडविले..

गेले तीन दिवस फोंडाघाट बाजारपेठेतील राधाकृष्ण मंदिरासह सर्व मंदिरे,साफसफाई- रामजन्म-प्रतिष्ठापना चे बॅनर- भगवे झेंडे फुलांची रोषणाई- विद्युत रोषणाई आणि रामायण- रामभक्ती गीतांनी भक्तिमय झाली होती.तीन दिवस स्थानिक भजन आणि आरती सह, आज हरिपाठ महाप्रसाद आणि २०२४ दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे पठण महिला मंडळाने सादर केले. महाआरतीला सरपंच संजना आग्रे , राजन चिके,संतोष आग्रे,बबन हळदीवे, विश्वनाथ जाधव महिला ढोल पथकाच्या सदस्य, राधाकृष्ण मंदिराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, वैश्य समाज बँकेचे प्रसाद पावसकर, बालगोपाळ मंडळाचे सर्व सहकारी, यांचे सह पेठेतील ग्रामस्थ- महिला पुरुष आणि युवाई मोठ्या संख्येने उपस्थित होती .महाप्रसादाचा बहुसंख्य भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी “एक दिवा- माझ्या रामाचा” ही संकल्पना बाळ गोपाळ मंडळांनी दीपोत्सवासाठी आयोजित केली आहे..

फोंडाघाट मधील श्री पाचोबा देवस्थान, कुर्ली वसाहती मध्ये मारुती मंदिर, हवेलीनगर येथे साई मंदिर, मारुतीवाडी येथे विठ्ठल- रखुमाई, मंदिर हनुमान मंदिर,गडगेसकल येथे दत्त मंदिर- गणेश मंदिर, ग्रामदेवता गांगो- माऊली मंदिर, बावीचेभाटले- पावनादेवी येथे विठ्ठल रखुमाई मंदिर- कालिका मंदिर,येथेही अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना आणि राम जन्मोत्सवा निमित्त रामनामाच्या जय जय कारात सोहळा उत्साहात संपन्न झाला. राधाकृष्ण मंदिर येथे राधाकृष्ण केबल नेटवर्क आणि अजित नाडकर्णी यांच्या सौजन्याने अयोध्येतील राम जन्म सोहळा मोठ्या केबल टीव्हीवर दाखवण्यात आला होता.लाडू वाटप ही करण्यात आले.त्यामुळे फोंडाघाट मध्ये आठवडा बाजार असूनही भाजीपाला-किराणा वगळता रस्त्यावर पादचारी- ग्राहकांची वर्दळ तुरळक होती. मात्र राम नामाचा जयघोष आणि धार्मिक उपक्रमांनी बाजारपेठेतील आणि पंचक्रोशीतील वातावरण उत्साही आणि भक्तमय झाले होते..

चौकट : — अयोध्येतील या देशव्यापी सोहळ्यानिमित्त फोंडाघाट एसटी स्टँड येथे गावातील युवा कलाकार शशांक गाड आणि समर्थ लोणचे कंपनीचे रमेश सिताराम नारकर यांच्या माध्यमातून श्री राम- हनुमान ची सर्वांग सुंदर रांगोळी साकारली आहे. स्टँड प्रमुख राठोड यांनी नारकर यांना या प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली असून कलाकार आणि नारकर काकांच्या औचित्याचे कौतुक होत आहे…