माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मध्ये गुरुकुल पूरक उपक्रमातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या १०३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फुलांचे हार व पुष्पगुच्छ बनवण्याचे य प्रात्यक्षिक घेण्यात आले .
यावेळी मार्गदर्शक म्हणून रमेश काळंबी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना हार व पुष्पगुच्छ बनवण्याचे त्यांनी शिकवले.हार व पुष्पगुच्छ बनवण्याच्या उद्योगात मोठी उलाढाल होत असते.व मोठे अर्थकारण आहे. या उद्योगाकडे विद्यार्थी वळावेत व स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी गुरुकुल उपक्रम प्रमुख सचिन साठे उपस्थित होते.











