चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक परिसर घोषणांनी दुमदुमला
चिपळूण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है… भारतीय जनता पार्टीचा विजय असो… देवाभाऊ जिंदाबाद… या गगनभेदी घोषणांनी शुक्रवारी सकाळी चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक परिसर दुमदुमून गेला. कारण होते भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडळ तर्फे राबविण्यात आलेली विशेष सफाई मोहीम… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व सेवा पंधरवड्याच्या औचित्याने सकाळी ८ ते १०.३० या वेळेत मध्यवर्ती व जुन्या बसस्थानकात भाजप कार्यकत्यांनी झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा संकल्प केला.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान, बस स्थानक आवारातील गवत काढून, प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचे रॅपर गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्र मात प्रवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि एक वेगळीच एकात्मतेची भावना निर्माण झाली. स्वच्छ भारताचा संदेश हा फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष कृतीतून द्यावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी सांगितले. स्वच्छतेच्या या उपक्रमातून मोदीजींच्या सेवाभावाचा संदेश जणू थेट चिपळूणच्या नागरिकांपर्यंत पोहोचला. एक दिवसाची सफाई मोहीम असूनही, नागरिकांच्या मनात मात्र स्वच्छता हीच खरी सेवा हा विचार पक्का झाला.
या मोहिमेत भाजप नेते प्रशांत यादव, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, रामदास राणे, विजय चितळे, आशिष खातू, नरेंद्र बेलवलकर, सारिका भावे, विनायक वरवडेकर, शीतल रानडे, रत्नदीप देवळेकर, रसिका देवळेकर, संदीप भिसे, वैशाली निमकर, अश्विनी वरवडेकर, नूपुर बचिम, पूनम काजरी, विनोद भोबसकर, निकिता रतावा, अभिजीत सावर्डेकर, मधुकर निमकर, अभिनव भूरण, जतिन घटे, विलास चव्हाण, अभिषेक राजपुरकर, निनाद आवटे, प्रभंजन पिपुटकर, कुणाल आंबेकर, योगेश शिर्के, चेतन मालशे आदी कार्यकत्यांनी उपस्थित राहून योगदान दिले.












