सरमळे सपतनाथ मंदीरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम.

ओटवणे | प्रतिनीधी : शनिवारी होणाऱ्या महाशिवरात्री च्या कार्यक्रमानिमित्त ओटवणे, सरमळे सीमेवर असणाऱ्या पांडवकालीन सरमळे सपतनाथ मंदीर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर रीती रिवाजाप्रमाणे मंदीरात सरमळे देवस्थानचे मानमान करी ढोल ताशा च्या गजरात तरंग सह ,पालखी सह मंदिरात देव देवतांचा भेटीचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ८.३०वाजता श्री देवी सातेरी भगवती कला क्रीडा मंडळ, सरमळे आयोजित ओंकार प्रासादिक मंडळ सरमळे देवुळवाडी बुवा समिर गावडे व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजीवली सोनारवाडी राजापूर चे बुवा प्रविण सुतार यांचा पारंपरिक डबल बारीचा जंगी सामना आयोजीत केला असून या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.