खेड (प्रतिनिधी) : येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे व गुरुकुल विद्यामंदीर गुणदे प्रशालेतील आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरुन सहक्षेपीत होणाऱ्या इंद्रधनु बालरंग कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थांनी हसत खेळत संवाद साधला. २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन असल्याने मतदार म्हणून १८ वर्षावरील जनतेची जबाबदारी, मतदार नोंदणी, मतदार हक्क, लोकशाही जडणघडणीमध्ये मतदाराचा सहभाग, मतदारांसंबधीत शंका समाधान, याविषयी विद्यार्थानी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रसारभारती रत्नागिरीचे श्री योगीराज बच्चे यांनी राष्ट्रिय मतदार दिन संवाद ध्वनीमुद्रनाच्या वेळी विद्यार्थांनी शालेय शिक्षणाबरोबरच जनजागृतीबाबत घेतलेल्या सहभागाबद्दल सर्व टीमचे कौतुक केले. या ध्वनिमुद्रनाचे रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरील इंद्रधनु बालरंग कार्यक्रमांतर्गत खेडशी रत्नागिरी येथील आकाशवाणी सहक्षेपण केंद्रावरुन प्रसारण होणार आहे. कु. सिमरन चाळके, गौरी आंबेडे, सोहम साळवी या विद्यार्थाचे संस्था अध्यक्ष विक्रांत आंब्रे व सर्व संचालक तसेच शालेय कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.











