वैश्ववाणी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीची बैठक घेण्याचे नाम. अतुल सावे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन देताना आमदार प्रमोद जठार, सुनिल खाडये, विकास संसारे आदी.

राजापूर | वार्ताहर : वैश्यवाणी समाजाला ओबीसी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी वैश्ववाणी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
वैश्यवाणी समाज हिंदूवैश्य, हिंदूवाणी अशा जन्मदाखलावर नोंदी असणारा लोकांना ओबीसी दाखले मिळण्यास येणारा अडचणी आहेत. याबाबत कणकवलीचे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष सुनिल खाडये व सचिव विकास संसारे यांनी भेट घेवून नाम. अतुल सावे यांना निवेदन दिले.
त्यावर नाम. अतुल सावे यांनी ३०/०१/२०२४ रोजी तातडीने ओबीसी विभागची बैठक लावून अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.