मंडणगड | प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ F1428 मुंबई संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड मध्ये, आज 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या कवायत संचालनात मान्यवरांचे आगमन झाले. त्यानंतर संस्थेचे सरचिटणीस श्री.ॲड.विनोद भाई दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर राज्यगीत, ध्वजगीत, ध्वज प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले व मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. याप्रसंगी काही विद्यार्थी, विद्यार्थिनी राष्ट्रीय पुरुषांचा पेहराव करून उपस्थित राहिले होते.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. संजय अवेरे व श्री .शैलेश खताते यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रजासत्ताक दिनाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रमेशजी दळवी , सरचिटणीस ॲड. विनोद भाई दळवी, सचिव ॲड . अभिजीत गांधी, खजिनदार श्री. सुरेश घोसाळकर, सदस्य श्री. आत्माराम सुतार ,श्री. संतोष मांढरे ,श्री. राकेश शिंदे ,श्री. प्रसाद हेंद्रे इत्यादी मान्यवर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजय खाडे, उपमुख्याध्यापक श्री.अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक श्री.शांताराम बैकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










