शिरगाव (वार्ताहर) साळशी गावकरवाडी गवळदेव येथील ओहळावर साळशी ग्रामस्थांनी श्रमदानातून कच्चा बंधारा बांधला. यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून पाण्याचे स्त्रोत बळकट होणार आहेत.
या श्रमदान महेश गावकर, राजेंद्र लाड, रविंद्र राणे, अजय लाड, मोहन साळसकर, सुधीर गावकर, विक्रांत लाड, सत्यवान लाड, सुशील लाड, दामू लाड आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.











