जि. प. शाळा कोळवली नं.१ चे क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी

केंद्रस्तरिय व बीट स्पर्धेत विद्यार्थी चमकले

चिपळूण ( वार्ताहर) : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कोळवली नं.1 शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रस्तरीय व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळाले आहे.

या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत

मोठा गट मुलगे है कबड्डीत विजेते ठरले. मुली ही कबड्डी विजेते झाले आहेत.

लंगडी गटात सुद्धा मुली विजेत्या झाल्या.

लहान गटात मुलगे कबड्डी उपविजेते तर मुली कबड्डी – विजेत्या ठरल्या.

 

याशिवाय वैयक्तिक क्रीडा प्रकारात कु. देव श्रीकांत घाणेकर यांचा धावणे व उंच उडी क्रीडा स्पर्धेत केंद्र स्तर व बीट स्तर प्रथम क्रमांक मिळवला आहे. कुमारी सहेली संदीप वाघे या विद्यार्थिनीचा केंद्रस्तरावर धावणे व लांब उडी व बीट स्तरावर लांब उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून

कू. देव श्रीकांत घाणेकर (कबड्डी)

कु. सहेली संदीप वाघे (कबड्डी)

कु. स्वराली संदीप वाघे (कबड्डी)

कु. राज दिनेश वाघे (कबड्डी)

निवड करण्यात आली होती.

तालुकास्तर क्रीडा स्पर्धेसाठी शाळेतील एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

शाळेचे मुख्याध्यापक विशाल रामचंद्र वसावे व मार्गदर्शक ऋषिकेश रमेश सुर्वे व आम्रपाली प्रदीप यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत रत्न घाणेकर , सदस्य व सर्व पालकांच्या सहकार्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली.