महामार्ग चौपदरीकणातील अपुऱ्या कामांकडे वेधले होते लक्ष
राजापूर (वार्ताहर): मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासनानंतर कोंढेतड गावचे माजी उपसरंच व सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणानंतर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मात्र अद्यापही अनेक कामे प्रलंबीत असल्याचे श्री. लांजेकर यांनी प्रशासन व संबधीत विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये राजापूर येथील सर्वात मोठा ब्रिज, एसटी डेपो ते पेट्रोल पंप स्ट्रीट लाईट चालू करणे, तसेच उन्हाळे गंगातीर्थ येथे पिकप शेड बांधणे, सर्विस रोड ची अपूर्ण काम पूर्ण करणे करणे, व शेतात जाणारे पायवाटा रस्ता बंद अवस्थेत असलेले शेतकऱ्यांच्या चालू करणे आदी विविध मागण्यांसाठी लांजेकर यांनी प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांसमवेत उपोषण छेडण्याचा ईशारा निवेदनाद्वारे दिला होता.
परंतु या निवेदनाची उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवनेवर, शाखा अभियंता कुमावत तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव, माजी नगराध्यक्ष जमीर खलीपे, अरविंद लांजेकर व गंगातीर्थ येथे महिला भगिनी व इतर ग्रामस्थ यांच्यासमवेत पाहणी झाल्यानंतर प्रलंबीत असलेली कामे मुदतपूर्व कालावधीत करण्याचे करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनीही या कामांची लवकरात लवकर पुर्तता करून घेण्याचे लेखी पत्र दिले असल्याची माहिती लांजेकर यांनी दिली आहे.










