कणकवली : शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलावर प. पू. भालचंद्र महाराज यांच्या भक्त व कणकवलीकरांकडून प. पू. भालचंद्र महाराज उड्डाणपुल अशा आशायचा बॅर्नर लावण्यात आला आहे. हा बॅर्नर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅर्नरद्वारे शहरातील उड्डाणपुलाला प. पू. भालचंद्र महाराज नाव देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची असल्याचे अधोरेखीत झाली आहे.
प. पू. भालचंद्र महाराज यांचा १२० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थानात २८ ते १ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. हा उत्सव सुरु असताना काही भक्त व कणकवलीकारांनी शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात उड्डाणपुलावर प. पू. भालचंद्र महाराज उड्डाणपुल बॅर्नर लावण्यात आला आहे. हा बॅर्नर चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील उड्डाणपुलाला प. पू. भालचंद्र महाराज किंवा कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची मागणी आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सोमवारी पहाटे प. पू. भालचंद्र महाराज यांच्या काही भक्त व कणकवलीकरांनी आप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलावर प. पू. भालचंद्र महाराज उड्डाणपुल अशा आशयाचा बॅर्नर लावला आहे. त्यावर कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, भालचंद्र महाराज व आप्पासाहेब पटवर्धन यांचे फोटो आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याची चर्चा झाल्या होत्या. मात्र, या संदर्भात ठोस तोडगा निघाला नव्हता. अखेर हा पुतळा काही शिवप्रेमींनी पहाटे सर्व्हिसरोड स्थलांतरित केला होता. आता उड्डाणपुलावर प. पू. भालचंद्र महाराज उड्डाणपुल अशा आशयाचा बॅर्नर लावून या पुलाचे नामकरण करण्यात आले आहे. हा बॅर्नर चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या बॅनर नंतर पटवर्धन चौकात फटाके जल्लोष साजरा करण्यात आला.











