मंडणगड l प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तालुका शाखेच्यावतीने पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष व सामाजीक कार्यकर्ते राजेश गमरे प्रजासत्ताक दिनी दोन मागण्यांकरिता भिंगळोली येथील तहसिल कार्यालयाचे आवारात उपोषणास बसले होते. यातील ग्रामिण रुग्णालयात डॉक्टरांचे नियुक्तीचे पत्र आरोग्य विभागने 29 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सत्रात दिले होते. सायकांळी उशीरा सार्वजनीक बांधकाम विभागाचे महाड येथील कार्यकारी अभियंता श्री. नामदे यांनी राजेश गमरे यांची भेट घेतली व यावेळी त्यांनी सावित्री नदीवर म्हाप्रळ आंबेत गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाचे मागणीसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा याकरिता आगामी बजेटमध्ये तरतुद करण्यात यावी यासाठी कार्यालयाकडून प्रस्ताव करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने दोन्ही विषयावरील सलग चार दिवस सुरु असलेले उपोषण आपण मागे घेत असल्याचे श्री. राजेश गमरे यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी तहसिलदार तानाजी शेजाळ, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गोवळे व विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते.











