आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय संघटक संदेश मोहिते यांचा सवाल
मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
चिपळूण (वार्ताहर) : मुंबई नायगाव, 13 बी.डी.डी.चाळीतील तळमजल्यावरील काँग्रेस पक्षाच्या अनाधिकृत कार्यालयाला अभय देणारे म्हाडाचे अधिकारी सुनील भडांगे यांच्यावर तात्काल कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राष्ट्रीय संघटक संदेश मोहिते यांनी निवेदन द्वारा केली आहे. हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मुंबई नायगाव 13 बी.डी. डी. चाळीतील पहिल्या मजल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यालय होते.पुनर्विकासाला उशीर होत म्हणून कार्यालय तोडण्यासाठी म्हाडाचे अधिकारी श्री.भडांगे सतत तगादा लावत होते. रिपाई कार्यालयाला त्रास व्हावा याकरिता भिंती तोडणे, साफसफाई न करणे, पाणी बंद करणे इत्यादी स्वरूपात त्रास देणे चालूच होते. चाळीत अनेक राजकीय पक्षाची कार्यालय होती. परंतु श्री.भडांगे जाणूनबुजून आम्हालाच त्रास देत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यालय अधिकृत असून सुद्धा तोडण्यासाठी म्हाडाचे अधिकारी श्री.भडांगे आणि पोलिस दबाव आणत होते. आमच्या कार्यालयामुळे पुनर्विकास कामाला उशीर होत आहे. त्यामुळे बजेट सुद्धा वाढत आहे अशी ओरड त्यांनी सुरू केली. मात्र, त्यानंतर आम्ही पक्षाचे कार्यालय खाली करून म्हाडाला सहकार्य केले . परंतु याच चाळीच्या तळमजला येथे काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असून सुद्धा श्री.भडांगे का तोडत नाही असा सवाल केला जात आहे?श्री.भडांगे यांनी पैसे घेऊन कार्यालय न तोडण्याच्या आश्वासन दिल्या आहे की काय? याची दाट शक्यता वाटत आहे. कारण अनधिकृत असून सुद्धा म्हाडा काँग्रेस पक्षाचे कार्यालय तोडलेले नाही.तात्काळ म्हाडाचे अधिकारी सुनील भडांगे यांच्यावर सीबीआय द्वारे चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)महाराष्ट्र संघटक संदेश मोहिते यांनी असेही निवेदनात नमूद केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त गृहनिर्माण मंत्रीअतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, तथा पालकमंत्री (मुंबई) दीपक केसरकर यांना सुद्धा निवेदन दिले आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.











