खेड | प्रतिनिधी : खेड आंबवली मार्गावरील मोहाने देवघर फाटा नजीक वळणाच्या रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर आदळून अपघात झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी एका दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग शंकर यादव (रा. आंबवली बौद्दवाडी ता. खेड जि. रत्नागिरी) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. तर या प्रकरणी नंदकुमार गणपती गावडे (वय ४६ वर्षे मुळ रा. जंगमहट्टे ता. चंदगड जि.कोल्हापुर, सध्या रा. भरणे, खेड) यांनी तक्रार दाखल केली आहे. दुचाकी स्वार यादव हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल (क्र. एम.एच.०४ / सी. व्ही/ ५६१) हीने गावडे यांच्या दुचाकीला ठोकर दिली यात दुचाकी स्वार यादव तसेच गावडे, निखील मिलिंद साळवी (रा.भरणे ता. खेड) हे जखमी झाले .












