लोरे नं. २ येथे उद्या भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ

वैभववाडी | प्रतिनिधी : लोरे नं. २ सुतारवाडी येथे श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२ फेब्रुवारी रोजी सकाळी देवीचे पूजन, सायंकाळी ५ वा. देवीचा जोगवा, ७ वा. दिवटी पेटवणे, ८ वा. ओटी भरणे, ९ वा. महाप्रसाद, रात्री १२ गोंधळी कथा, शनिवार दि. ३ रोजी रात्री ९ वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रविवार दि. ४ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, ११ वाजता आरती, महाप्रसाद , रात्री ९ वाजता सत्कार सोहळा, रात्री १० वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस ता. सावंतवाडी यांचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवतरुण भजन व नाट्य मंडळ सुतारवाडी लोरे नं २ यांच्यावतीने करण्यात आले आहे.