निवेदनाद्वारे करण्यात आल्या विविध मागण्या
लांजा( प्रतिनिधी) सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्या संदर्भात आज गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट)च्या वतीने लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. आणि त्याद्वारे विविध मागण्या करताना या प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना तालुकाध्यक्ष अनंत आयरे यांनी सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न हे खितपत पडून आहेत आणि हे प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याने म्हटले आहे. यामध्ये अनेक मागण्या केल्या आहेत .त्यामध्ये अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी. राज्यात रिक्त असलेली सर्व विभागाच्या सर्व संवर्गाच्या अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती बंद करावी आणि आवाजही परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यासारख्या भरती प्रक्रिया सुरू कराव्यात. राज्यात पेपरफुटी संदर्भात राजस्थान ,उत्तरखंडाच्या धर्तीवर कडक कायदा करावा ,दत्तक शाळा योजना रद्द करावी, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण आणावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजमाफी करण्यात यावी. खेळाडूंची रखडलेले थेट नियुक्ती द्यावी .मराठा समाजाच्या आरक्षणातील संभ्रम दूर करून धनगर मुस्लिम व लिंगायत या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा 50% च्या पुढे वाढवण्याबाबत पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्या
त्वरित वितरित करण्यात याव्या.
तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका समुदाय आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचालक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड अशा सर्व संघटनांची चर्चा करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, दुधाला हमीभाव देण्यात यावा यासाठी अनुदान देण्यात यावे यासारखे अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे (शरद पवार गट )तालुका अध्यक्ष अनंत आयरे ,तसेच दत्तराम साळुंखे, महिला शहराध्यक्ष विजया जगताप, महिला तालुकाध्यक्ष वैष्णवी बाईंग तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या सौ पालये आदी उपस्थित होते.











