अभिरूची स्वरोत्सव ३ फेब्रुवारीपासून

 

देवरुख: अभिरुची संस्थेच्यावतीने दि. ३ ते ५ फेबÏुवारी रोजी अभिरूची स्वरोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. गायन,बासरीवादन व संगीत जय जय गौरीशंकर हे नाटक होणार असल्याची माहिती अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली देवरुख येथील अभिरुची संस्थेचा अभिजात संगीत ,नाटक यांनी सजलेला स्वरोत्सव फेबÏुवारीमध्ये होणार आहे.

शनिवार दि. ३ फेबÏुवारी रोजी राञौ ९.३० वाजता पं. अजय चक्रवर्ती आणि पं. पद्माकर थत्ते यांचे शिष्य मेहेर परUीकर यांचे शास्ञीय व उपशास्ञीय गायन होणार आहे.त्यांना रामकृष्ण (प्रसाद करंबेUकर)यांची तबलासाथ व चैतन्य पटवर्धन यांची हार्मोनियम साथ लाभणार आहे. रविवार दि.४ रोजी राञौ ९.३० वाजता पं.हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य, सूरताल, सारेगमप चे साक्षिदार अमर ओक यांची बासरी वादनाची मैफल रंगणार आहे.

सोमवार दि.५ रोजी राञौ ९.३० वाजता मराठी संगीत रंगभूमीवर गाजलेले विद्याधर गोखले लिखित जय जय गौरीशंकर हे नाटक सादर होणार आहे.मुंबई (वाघांबे) येथील परस्पर सहाय्यक मंडUाचे कलाकार हे नाटक सादर करणार आहेत. तीन दिवसांचा हा स्वरोत्सव पिञे कलामंच येथे रसिकांना विनामूल्य पहायला मिUणार आहे. रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांनी केले आहे.