वेंगुर्ले l प्रतिनिधी :महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिंदी विषयाच्या विविध परीक्षांमध्ये श्री सरस्वती विद्यालय आरवली – टाक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेला ६ विद्यार्थी बसले होते. ते सर्व विद्यार्थी पास होऊन १०० टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता, प्रथम श्रेणी ४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १ विद्यार्थ्याला मिळाली. यामध्ये कु. तनिष विजय धुरी ७८ प्रथम क्रमांक, कु. काव्या शंकर नाईक ७२ द्वितीय, कु. दिया नरेंद्र मोंडकर ७१ तृतीय
राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेला ९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व विख्यार्थी पास होऊन १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणी ७ विश्यार्थी, तृतीय श्रेणी २ विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. यामध्ये कु. पूर्वा बापू भानजी आणि कु. पूर्वी भिवा धुरी या दोघांनी समान ७० गुण प्रथम क्रमांक, कु. सुभाष किरण बागकर ६८ द्वितीय क्रमांक आणि कु. साईराज गोरख नेवसे ६६ गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला.
राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेला इ ८ वी चे १६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ते सर्व विदयार्थी पास होऊन १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणी ३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ४ विद्यार्थी तसेच तृतीय श्रेणी ९ विद्यार्थ्यांना मिळाली. यामध्ये कुं. स्नेहल संतोष भुबे १३२ प्रथम क्रमांक, कु. तनिशा गजानन धुरी १२७ द्वितीय क्रमांक आणि कु. ऋतुज हृदयनाथ गोडकर ने १२२ गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे अभिनंदन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना हिंदी विभाग प्रमुख श्रीम एस. एस. नाईक मॅडम, श्रीम डी. आर. झोरे तसेक श्रीम. एन. आर. वालावलकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.











