कोलगाव येथे आनंदाचा शिधा वितरण

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना व येथे शिवजयंतीचे औचित्य

सावंतवाडी l प्रतिनिधी :श्रीराम प्राणप्रतिष्ठापना व येथे शिवजयंती निमित्त शासनाच्यावतीने कोलगाव येथे गावातील रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला. कोलगाव सोसायटीच्यावतीने हे वितरण करण्यात आले.

यावेळी कोलगाव सोसायटीचे चेअरमन वीरेंद्र धुरी, माजी सरपंच भाई राऊळ, संदीप हळदणकर, पुंडलीक राऊळ आदी उपस्थित होते.