भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवास प्रारंभ…!

 

पुढील चार दिवस साजरे होणार धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम…!

कणकवली-(प्रतिनिधी)

योगियांचे योगी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्यास सोमवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भालचंद्र महाराजांच्या संस्थानात प्रारंभ झाला. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पहाटे ५.३० ते ८ यावेळेत काकड आरती, समाधी पूजा, अभिषेक झाला. त्यानंतर ब्रह्मवृंदाच्या मंत्रोपचाराने सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र विष्णू याग

पार पडला. यावेळी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे सुरेश कामत, श्री काशीविश्वेवर मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड प्रवीण पारकर, संस्थाचे

खजिनदार दादा नार्वेकर, विश्वस्त प्रसाद अंधारी,व्यवस्थापक विजय केळुसकर, बाळा सापळे, दत्ता सपाळे, श्रीरंग पारगावकर, महेश कुडाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

परमहंस भालचंद्र विष्णू यागाची पूजा निखिल कुडाळकर दाम्पत्याने केली. दुपारी भालचंद्र

महाराज यांची आरती झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारच्या सत्रात भजनी कलाकारांनी भजने सादर करत वातावरण भक्तीमय केले.

त्यानंतर शाळा नंबर ३कणकवली प्रस्तृत मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रात्री दैनंदिन आरती झाली. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पू. प.भालचंद्र महाराज यांचे समाधी स्थळ व मूर्ती फुलांनी सजविण्यात आली आहे.

उद्या (१० जाणे.) रोजी होणारे कार्यक्रम

मंगळवारी सकाळी ५.३० ते ८ वा. काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, सकाळी ८.३० ते १२ यावेळेत सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र विष्णू याग,

दुपारी आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी १ ते रात्री ८ यावेळेत भजने व भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवलचा ‘कंसवध’ प्रयोग सादर होईल.