मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम सोमवारी सर्जेकोट जेटी समुद्रात घेण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक यावेळी सहभागी झाले.
रंगीत तालीम मध्ये बोटीवरील एक खलाशी पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्याला वाचवण्याबाबत यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पोलीस पथक खाजगी बोटीतुन घटनास्थळी पोहचले. समुद्राच्या पाण्यात बुडत असलेल्या खलाशाचा उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे जीव वाचवण्याबात रंगीत तालीम यशस्वी पध्दतीने करण्यात आली.