खेड(प्रतिनिधी) देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने आता पाणीप्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी विजयी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामस्थांच्या श्रमदानातून गावातील नदीवर विजय बंधारा बांधला आहे.
सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामसेवक दीपक कदम व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर या अभियानापाठोपाठ स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून या अंतर्गतही स्वच्छतेविषयक नवनवे उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे.
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत आता ग्रामस्थांना सतावणारी पाणीटंचाई संपुष्टात आणून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आतापासूनच नियोजनाची आखणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने
ग्रामस्थांच्या सहभागातून पहिला विजयी बंधारा बांधत नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या विजयी बंधाऱ्यात पाणीसाठाही मुबलक आहे











