सावंतवाडी परमार्थ निकेतन येथे ४ ते १० फेब्रुवारी पर्यंत हरिनाम सप्ताह

सावंतवाडी । प्रतिनिधी : बेळगांव निवासी परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांच्या शिकवणुकीप्रमाणे बेळगांव येथील श्रीहरी मंदिरातील भक्त मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी निमित्त हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. ४ फेब्रुवारी ते शनिवार दि. १० फेब्रुवारी पर्यंत साजरा हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी ६ ते रात्रौ १० अखंड नामः स्मरण, सकाळी ७ ते ८.३० पुण्यतिथी, प्रातःस्मरण, भजन, दुपारी १०.३० ते १२ पुण्यातिथी – दुपारचे भजन, सायंकाळी ४ ते ५.३० पुण्यतिथी – साय:स्मरण व वाचन त्यानंतर रात्रौ ९ ते १०.३० श्रीकृष्णप्रताप, गौळणी, वाचन व प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत.
परमार्थ निकेतन नरेंद्रमार्ग, जुना बाजार, सावंतवाडी येथे प. पू. आई पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात येईल. तरी सर्व भाविक बंधु-भगिनींनी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिध्दकला विश्वस्त मंडळ, सावंतवाडी यांनी केले आहे.