माझ्या मनातील राम निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर!

 

बॅ नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने आयोजित ‘माझ्या मनातील राम’ या निबंध स्पर्धेला फार मोठा प्रतिसाद लाभला.

सिंधुदुर्ग सोबतच इतर जिल्ह्यातूनही एकूण ९३ स्पर्धकानी भाग घेतला.

यापैकी पुढील २० स्पर्धकांचे निबंध बक्षीस पात्र ठरले आहेत.जान्हवी बांदवलकर, सुधीर गोसावी,मनाली वेंगुर्लेकर, मैत्रेयी बांदेकर,डॉ दर्शना कोलते, वैष्णवी आचरेकर,सायली चव्हाण, काव्य दळवी,

शुभदा पेडणेकर, अंकिता पाटील, डॉ. हर्षदा देवधर, डॉ. हेमंत पेडणेकर,

अदिती पै, सतीश लळित,

संजय आचरेकर, शुभांगी सौदागर, मेघना जोशी, विनीता पांजरी,जीवन लोटे, संजय तांबे.

या सर्व २० गुणवंतांचे क्रमांक बक्षीस वितरणावेळी जाहीर करण्यात येतील.

सर्व विजेत्यांना बक्षीस असणार आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी

दुपारी ३.३० वाजता

बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी ॲड. देवदत्त परुळेकर यांचे

राम, रामकथा

आणि गांधी

या विषयावर विशेष व्याख्यान होईल.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रसाद घाणेकर असणार आहेत.

सर्वानी या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर,

कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.