सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव रेडकरवाडी रस्ता नूतनीकरण कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. पंधरावा वित्त आयोग पंचायत समिती स्तरच्या माध्यमातून हे काम मंजूर करण्यात आले आहे.
या भूमिपूजन प्रसंगी मळगाव प्र.सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, गोपाळ सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र रेडकर, भगवान रेडकर, सचिन रेडकर, अमित मांजरेकर, संतोष रेडकर, शशी राऊळ,
सौ. हर्षदा पेडणेकर, प्रसाद नाईक, राजन राऊळ, पार्थ सातार्डेकर, पारस पेडणेकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षे या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत होती. ती पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. उर्वरित रस्त्याचे नूतनीकरणही मंजूर करण्यात यावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी माजी आमदार राजन तेली यांच्याकडे केली.










