महाळुंगे ग्रामस्थ भरवणार उद्या पंचायत समितीसमोर शाळा

महाळुंगे शाळा नंबर १ वर मागील तीन महिन्यापासून फक्त एक शिक्षक आहेत शाळा सातवी पर्यंत असून पट ३२ आहे,एक शिक्षक यांना शिकविणे,मुख्याध्यापक काम, ऑनलाईन माहिती भरणे ही कामे असतात त्यामुळे त्यांना अवघड होते शाळेला चार शिक्षक मंजूर आहेत पैकी दोन बदली होऊन गेले,

एकांचा अपघात झाल्याने येत नाहीत याकरिता अनेक वेळा संबधित अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली परंतु उपयोग झाला नाही,मागील तीन महिने अभ्यास नाही त्यापेक्षा मुलांना घरीच ठेवू या निर्णयावर पालक आलेत याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे उद्या सोमवार ५ फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती देवगड या ठिकाणी शाळा भरविणार आहे.