इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानच्या डाळपस्वारीत भाविकांची अलोट गर्दी

३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत सुरू होती डाळपस्वारी

शिरगाव | वार्ताहर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-यांऐशी खेड्याचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानची डाळपस्वारी उत्साहात,चैतन्यात व अलोट गर्दीत संपन्न झाली. डोल ताशाच्या गजरात,फटक्याच्या आतषबाजीत व हर हर महादेव च्या जल्लोषात वस्ञभुषणांनी सजविलेले देवतरंगासह शाही लव्याजम्यासह हि देवता बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, भक्तगण, देवाचे सेवेकरी यांच्यासह डाळपस्वारीसाठी ३१ जानेवारी रोजी श्री देवी पावणाई देवालयाततून निघाली.आणि चार दिवस चतु: सीमाफेरी करुन 3 फेब्रुवारी रोजी श्री देवी पावणाई देवालयात स्वगृही शाही थाटात परतली.

यावेळी देवस्वारीस रात्री उशीर झाला असला तरी भक्तगणांच्या चेहर्‍यावरील उत्साह व आनंद कमी न होता तेव्हढाच दिसत होता. या देवस्वारीच्या मार्गक्रमण करीत असतानाच्या पुर्वपांर चालत आलेल्या पायवाटा या रानातून, जंगलातून जाणा-या अवघड आहेत. तरीहि या देवस्वारी सोबत उन्हा-तान्हातून लहान मुले ,वृध्द, महिला सहभागी झाल्या होत्या त्याचा आनंद कमी होत मव्हता. हा तसेच हा जंगल भाग हर हर महादेव व डोल ताशाच्या गजराने दुमदुमून गेला.

यावेळी भाविकांची लांबच लांब रांग लक्ष वेधून घेत होती. देवस्वारीच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून भक्तगणांना महाप्रसाद, चह- लाडू, गुळ पाणी, सरबताची सोय करण्यात आली होती. या डाळपस्वारीनिमित्ताने चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावात दाखल झाले होते. दुरवरून माहेरवाशीणीही कृपाशिर्वादास घेण्यासाठी आल्या होत्या. या डाळपस्वारी मुळे संपूर्ण गावात उत्साहाचे चैतन्याचे वातावरण पसरले आहे.