ओटवणेतील ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरला दशावतार योद्धा अणाव. तर उपविजेता साई यश बारा जण पेडणे गोवा.

ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणेतील सामजिक कार्यकर्ते बबलू गावकर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित भव्य ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरला दशावतार योद्धा अनाव तर उपविजेता ठरला साई यश बारा जण पेडणे गोवा . तत्पूर्वी अंतिम दिनी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये पहिला सामना झाला तो हे मिरा दोडामार्ग आणि साई यश बारा जण. या सामन्यात दोडामार्ग संघाने दिलेले ३५धावांच आव्हानं १९चेंडूत पुर्ण करत साई यश बारा जन पेडणे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दुसरा उपांत्यपूर्व सामना झाला तो बलाढ्य राजाराम वॉरियर्स आणि बॅड बॉईज संघात . ज्यात राजाराम वॉरियर्स तळवडे ने दिलेले ३१धावांच आव्हान घेवून उतरलेला कारीवडे संघ केवळ २५ धावा बनवू शकला राजाराम वॉरियर्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तिसरा उपांत्य पूर्व सामना साई इलेव्हन ओटवणे विरूद्ध ओम श्रेयस स्पोर्ट ओटवणे या संघा दरम्यान झाला.

यात साई इलेव्हन संघाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला तर उपांत्यपूर्वफेरीच्या अंतिम सामन्यात अणाव संघाने कोलगाव संघावर मात करत उपांत्य फेरी गाठली. पहिला उपांत फेरीचा सामना रंगला राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध साई यश बारा जण संघात . साई यश बारा जण संघाने दिलेले ५५धावांचे आव्हान राजाराम वॉरियर्स संघाला पेलवले नाही साई यश १२ जण संघाने विजय मिळवत अंतीम फेरीत प्रवेश मिळविला. यानंतर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अणाव संघाने ६५ धावा कुटल्या हे आव्हान ओटवणे संघाला पेलवल नाही हा सामना जिंकत दशावतार योद्धा अनाव संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५षटकात साई यश बारा जण पेडणे गोवा संघाने ७गड्यांच्या मोबदल्यात ४३धावा बनवत ४४धावांच आव्हान अनाव संघासमोर ठेवले हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत अनाव संघाने ध्रुव चषकावर आपले नाव कोरले. विजेत्या अणाव संघाला रोख रुपये ५००२४ व भव्य ध्रुव चषक तर उपविजेत्या साई यश बारा जण संघाला २५०२४ रुपये व भव्य ध्रुव चषक देण्यात आला.स्पर्धेतील उत्कृष्ठ गोलंदाज साई यश बारा जण चा प्रविण सावंत तर फलंदाज अनाव संघाचा विशाल लुडबे तर मालिकावीर ही ठरला अनाव संघाचा विशाल लुडबे.

या संपुर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून महेश डोंगरे, संजय हळदणकर यांनी काम पाहिले, समालोचक म्हणून गुरू चिटणीस ,जय भोसले आणि दशरथ शृंगारे यांनी काम पाहिले तर संपुर्ण स्पर्धेत गुणलेखक म्हणून अमोल केसरकर यांनी काम पाहिले . यावेळी बबलू गावकर,महेश गावकर, शंकर वरणेकर, राजाराम वर्णेकर, बाळा गावकर, अरुण खरवत, मंगेश गावकर, उमेश गावकर,जयवंत वारंग आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाना तसेच खेळाडूंना गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे तसेच चौगुले मित्रमंडळाचे आभार या स्पर्धेचे पुरस्कर्ते बबलू गावकर यांनी मानलेत.