इन्सुलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बांदा | प्रतिनिधी : इन्सुली कुडवटेंब येथील संदेश एकनाथ कळगुंटकर (३४) या युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घरात कोणी नसल्याचे पाहून रविवारी दुपारी त्याने आत्महत्या केली. याबाबत बांदा पोलिसांत त्याचा चुलत भाऊ सर्वेश कळगुंटकर याने खबर दिली. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इन्सुली कुडवटेंब येथे कळगुंटकर याचे घर आहे. त्याची आई दुपारी बचत गटाच्या मिटिंग साठी बाहेर गेली होती. ती मिटिंगहून घरी परतली आणि संदेशला हाक मारत होती. मात्र घरातून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने शेजारच्याना हाक मारली. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.