संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त २४ रोजी सुगम संगीत गायन स्पर्धा

चिपळूण (प्रतिनिधी) : रोहिदास समाज सेवा संघ, चिपळूण या नोंदणीकृत सामाजिक संस्थेमार्फत शनिवार दि.२४ रोजी संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त सुगम संगीत गायन (अभंग व भक्तीगीत) स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या विद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांनी विनाशुल्क नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा.

या स्पर्धेचे ठिकाण रोहिदास भवन, मार्कंडी चिपळूण येथे असून सायंकाळी ४ वाजता स्पर्धा होईल. स्पर्धा गट- प्रथम- वयोगट १४ वर्षापर्यंत, द्वितीय- वयोगट १४ वर्षापुढील. हार्मोनियम व तबला साथ संयोजकांकडून पुरविले जाईल. स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी गटानुसार प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह पारितोषिक देवून मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी चंद्रकांत सावर्डेकर (७०३८०५४६६०), प्रकाश पेढांबकर (९४०३५०४४९०), मंगेश पेढांबकर (८३८०९६४५३२), संदिप मुंढेकर (९१५८४३६०७२) यांच्याकडे संपर्क साधावा