अधिक अर्थार्जनासाठी तेलगडे स्वतःच करतात विक्री

पाटपन्हाळे येथे कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ

गुहागर (प्रतिनिधी):    पाटपन्हाळे येथील प्रगतीशिल शेतकरी व कलिंगड उत्पादक शेतकरी तेजस तेलगडे व तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ गुहागर चिपळूण राज्यमार्गावर पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे व आदर्श शिक्षक मकरंद विचारे यांच्या हस्ते झाले.

गेली अनेक वर्ष शेतीवरच उदरनिवाह करणारे व शेतीत विविध प्रयोग करणारे पाटपन्हाळे येथील शेतकरी तुकाराम तेलगडे हे पाटपन्हाळे कोंडवाडी येथे काही वर्षापासून कलिंगडाची आधुनिक पद्धतीने लागवड करीत आहेत. यावर्षी सुद्धा तीन महिन्याच्या कमी कालावधीतील ‘कॅश क्राॅप’ असलेल्या कलिंगडाचे सुमारे दोन एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. या लागवडीच्या पंचायत समितीच्या कृषी अधिकारी ,कृषी विस्तार अधिका-यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आसल्याचे तेलगडे यांनी सांगितले.एवढेच नव्हे तर या उत्पादीत केलेल्या कलिंगडाला योग्य दर मिळावे व स्वतःच त्याची विक्री व्यवस्था करावी या उद्देशाने त्यांनी व त्यांचे चिरंजीव तरूण शेतकरी तेजस यांनी गुहागर चिपळूण राज्यमार्गावर विक्री केंद्र उभारले आहे.

मागच्या वर्षी एका वाहनाने धडक देवून हे विक्री केंद्राची शेड पूर्णपणे उद्धस्वत केले होती.यावर्षी पुन्हा नव्याने विक्री केंद्राची ही शेड उभारली आहे.

मागच्या वर्षी या विक्री केंद्राला आ.भास्करराव जाधव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आवर्जून भेट देवून तेलगडे यांचे कौतुक केले होते.

यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर ग्राम विकास अधिकारी साईनाथ बागूल ,श्रीम.बडद व तेजस तेलगडे उपस्थित होते.

 

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम जाधव व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी पाटपन्हाळे येथील शेतकरी तेलगडेंप्रमाणे तालुक्यातील कलिंगड व इतर भाजीपाला उत्पादीत शेतक-यांनी स्वतःची विक्रीव्यवस्था स्वतः करून अधिक फायदा मिळवावा असे सुचवून तेलगडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.