गुहागर प्रतिनिधी:
वडद काजूवाडी विठ्ठल मंदीर(संजय भुवड घर) ते अंगणवाडी रस्त्याचे भूमिपूजन राजेश बेंडल यांच्या हस्ते पार पडले.
वडद काजूवाडी ग्रामस्थ यांनी राजेश बेंडल यांच्या कडे केलेल्या मागणी नुसार राजेश बेंडल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा करत जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 8 लाख रुपये निधी मंजूर करून आणून दिलेलं आश्वासन पूर्ण केले आहे.या रस्त्याचा कामाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे मुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी वैभव आदवडे, शाम आठवले, वडद गावच्या सरपंच कोमल मुरमुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश पाडेकर, माजी सरपंच रमेश भुवड, वसंत शिगवण, मोहन भुवड, सुनील मांडवकर वडद ग्रामसेविका करंदीकर व वडद
मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.












