
संतोष राऊळ (कणकवली)परमहंस भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी मंडळ सिंधुदुर्ग,ची “कणकवली ते पंढरपूर” अशी पायी दिंडी माघ वारीसाठी आज रवाना झाली. परमहंस भालचंद्र महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊ ही दिंडी रवाना झाली. कलमठ येथील ग्रामदैवत श्री काशी कलेश्वर मंदिरात दुपारची पंगत घेऊन ही दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली. शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेली ही दिंडी ह.भ.प. कै. आबा पाटील आणि ह. भ. प. कै.बाळासाहेब अंधारी यांच्या प्रेरणेतून ही दिंडी रवाना झालेली आहे. या दिंडीला सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी शुभेच्छा ही दिल्या आहेत.
आज मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी निघालेली ही दिंडी रविवार १८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.आज सकाळी रवाना झालेल्या या दिंडीत भालदार, चोपदार, विणेकरी असा लवाजमा सह असंख्य पुरुष आणि महिला वारकरी भालचंद्र बाबांची पालखी घेऊन टाळ मृदुंगाचा जयघोष करत भालचंद्र बाबांच्या मठातून दिंडीचे प्रस्थान झाले. कणकवली बाजारपेठेतून, मुख्य चौकातून काशी कलेश्वर मंदिराकडे ही दिंडी रवाना झाली. त्यानंतर तिथून पहिला मुक्काम करूळ गावी होणार आहे.












