पिंजऱ्यात भक्ष्य पाठवूनही बिबट्या विहीर सोडेना…

वन विभागाने लढवली मग नामी शक्कल… पहा कोणती

रत्नागिरी | प्रतिनिधी :

संगमेश्वर, करंजारी येथील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका करण्यात वन विभागाला यश आले.

मंगळवारी 06/02/2024 रोजी सकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास कारंजारी गावाच्या दक्षिणेस 500 मीटर अंतरावर राष्ट्रीय मार्गाच्या दक्षिणेस 20 मीटर अंतरावर असणाऱ्या शेडनेट ने बंदिस्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असणाऱ्या विलास तुळशीराम बेर्डे यांच्या घरासमोरील विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची खबर श्री.बेर्डे यांनी वनपाल संगमेश्वर यांना 7: 30 वाजता सकाळी सांगितले.

त्या नंतर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून वनपाल यांनी माहिती दिली . त्यानंतर वनविभागाच्या रेस्कु टीम जागेवर जाऊन पाहणी केली असता भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असलेची माहिती विहीर मालक यांनी सांगितली. सदर विहीरीची पाहणी केली असता,विहीर जवळपास 40 फुट खोल असुन गोलाई 14 फूट व चिरेबंदी आहे. विहिरचा कठडा 4 फूट आहे. बिबट्या पाण्याच्या वरच्या बाजूला कपारीत बसला होता.

सदरचे विहीर ही घरच्या पाण्यासाठी वापरात असून ,सदरची विहीर ही घराच्या समोर आहे. विहिरी मध्ये बिबट्याला पिंजऱ्यात घेणे साठी पिंजरा विहिरीत सकाळी 9:00 वाजनेचे दरम्यान सोडण्यात आला त्यानंतर साधारणतः 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने पिंजाऱ्यामध्ये भक्ष ठेऊन पिंजरा पुन्हा विहिरीत सोडण्यात आला तरीही संध्याकाळी 5.00वा पर्यंत बिबट्या आला नाही. त्यामुळे टँकर च्या सहाय्याने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यानेसुमारे संध्याकाळी 7:30 वाजणेचे दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला.

सदर बिबट्या हा साधारण चार वर्षाचा असुन तो नर आहे. सदर वन्यप्राण्यांस पशुसंवर्धन अधिकारी संगमेश्वर आनंदराव कदम यांच्या कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले त्या नंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी श्री निलेश बापट यांच्या मार्गदर्षणाखाली बिबट्या स नैसर्गिक अधिवासात सोडून दिले व रेस्कु ऑपरेशन सुरक्षित पार पाडले असून ,सदर कामगिरी साठी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी , तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर,एन एस गावडे वनपाल पाली , अरुण माळी वनरक्षक दाभोळे ,राजाराम पाटील वनरक्षक फुणगुस ,सहयोग कराडे वनरक्षक साखरपा ,प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी ,सुरज तेली वनरक्षक तपासणी नाका साखरपा पोलीस पाटील करंजारी समीक्षा शेणवे ओंकार कोलते उपसरपंच साखरपा गौरव संसारे माजी सरपंच नाणीज पत्रकार राजन बोडेकर थानिक ग्रामस्थ यश कोळवणकर ,निरंजन हेगिष्ठे ,अनिकेत मोरे ,अरबाज वाडकर ,जितेंद्र गजबार ,दिलीप साबळे उपस्थित होते .

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.