चिपळुणात हायवे वृक्ष लागवड समिती बैठकीत निर्णय
मार्गदर्शक तत्वांचा अवलंब नाही
चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या इंदापूर ते तळगाव (राजापूर) या रायगड व रत्नागिरी जिल्हा हद्दीतील मार्गावर तसेच रुंदीकरण करण्यात आलेल्या गुहागर-विजापूर रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी इंडीयन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्षलागवड व त्यांचे योग्य संगोपन केले जात नसल्याचा आरोप नुकताच हायवे वृक्ष लागवड समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे १ मे रोजी समितीचे शाहनवाज शाह यांनी पुकारलेल्या ‘खड्डा दफन’ आमरण उपोषण आंदोलनावर ठाम राहाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या बैठकीत समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नारायण राणे, खासदार रवींद्र इंद्रनील मनोहर नाईक, खासदार बांधकाम मंत्री वायकर, आमदार भास्कर जाधव, दलवाई, विनायक राऊत, माजी शेखर निकम, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार सदानंद चव्हाण व रमेश कदम यांना निवेदने दिल्याचे उपोषणाला ठाकरे शिवसेना पक्षाच्या दक्षिण विभागाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी, तसेच रत्नागिरी येथील रत्नागिरी पर्यटनचे राजू भाटलेकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच शहरातील रंजिता ओतारी ट्रस्ट, अग्रीमा महिला संघटना, दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे, देवरुखमधील युयुत्सु आर्ते यांच्यासह सामाजिक संस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मध्यभागी झाडे लावण्यास सुरुवात केल्याचे समितीने सांगितले. मात्र, कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना नव्याने लावलेल्या झाडांचे संगोपन व पाणीपुरवठा, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित करत बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. या बैठकीला नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, बापू काणे, राजन खेडेकर, श्रीराम रेडीज, भरत लब्धे, उदय ओतारी, प्रदीप पवार, आसिफ मुकादम, मंदार चिपळूणकर, सोहम घोरपडे, अजित जोशी, पृथ्वीराज पवार, दिगंबर सुर्वे, दिनेश दळवी, इनायत मुकादम, तुळशीराम पवार, रोहन मोरे, कृष्णाजी कोकमकर, शाहनवाज शाह उपस्थित होते.











