माता रमाई जंयतीला वणंद येथे आलेल्या अनुयांयाची रिपाइं (आ) तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने चोख व्यवस्था.  

विविध सुविधांनी हजारो अनुयायी समाधानी

मंडणगड l प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तालुका मंडणगड यांच्यावतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त वणंद ता दापोली व डॉ. बाबासाहेबांचे तालुक्यातील मुळ गाव आंबडवे येथे 6 व 7 फेब्रुवारी 2024 रोजी दरवर्षी भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो अनुयायांची प्रवासातील गैरसोय दुर व्हावी त्यांचा प्रवासाचा क्षिण कमी व्हावा या करिता दापोली फाटा भिंगळोली येथे मोफत चहा, पाणी, नाष्ठा, जेवण स्वच्छतागृह व प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वणंद व आंबडवे येथे आलेल्या राज्यातील हजारो अनुयायांनी या सुविधांचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.

(7) रोजी रिपाइं तालुकाशाखेच्यावतीने माता रमाई यांची जंयती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. रिपाइंचे राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, कार्याध्यक्ष संदेश खैरे, सरचिटणीस रामदास खैरे, उपाध्यक्ष अरविंद येलवे, चिटणीस जितेंद्र जाधव, युवक अध्यक्ष संकेत तांबे, जिल्हा संघटक विजय खैरे, युवक उपाध्यक्ष सचिन खैरे, युवक सरचिटणी राकेश कासारे, जिल्हा प्रतिनिधी किरण पवार, प्रसिध्दी प्रमुख विधान पावर, लुकमान शार्दुल्ला, आदीत्य लोखंडे, अनिकेत कासारे, सुनिल तांबे, आकाश पवार, योगेश कासारे, अतुल कासारे, राज खैरे, प्रणित खैरे, रोशन धोत्रे सुशिल लोखंडे, सुशांत खैरे, भगवान खैरे यांनी दोन दिवस सुरु असलेल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.