संपुर्ण महाराष्ट्रात भाजपाचे गाव चलो अभियान
गुहागर | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे गुहागर तालुक्यातील प्रत्येक बुथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शृंगारतळी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, आजी माजी पदाधिकारी बैठक घेण्यात आली यामध्ये गाव चलो अभियानांतर्गत १४० बुथवरचे निवासी प्रवासाचे नियोजन करण्यात आले. प्रवासी कार्यकर्ते हे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती, विविध महत्वपूर्ण निर्णय,संघटनात्मक कामकाज आदी विषयांची माहिती देऊन कामकाज करणार आहेत.
गुहागर तालुक्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, पंचायत राज व ग्रामविकास सेल जिल्हा संयोजक यशवंत बाईत, तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र अवेरे, दिनेश बागकर, कोषाध्यक्ष संतोष मावळणकर, माजी सभापती दिप्ती असगोलकर, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, अरूण रहाटे, तालुका उपाध्यक्ष मुबीन ठाकूर, रघुनाथ घाणेकर, मंगेश रांगळे, विजय मिशाळ, श्रद्धा घाडे, चिटणीस कृष्णा गोरीवले, ज्योती परचुरे, वैशाली मावळणकर, भगवान कदम आदींसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.











